बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स कलाकारांनाही करोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह 4 कुटुंबातील सदस्य करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
Amitji, Abhishek, Aishwarya & Aaradhya… Our heartfelt best wishes for your speedy recovery 🙏 My earlier tweet was not a typo, I meant , when I wrote , Ayurveda , that with Nature’s Grace , it will help to recover fast . 🙏😇🌿⭐️@SrBachchan @juniorbachchan
— Juhi Chawla (@iam_juhi) July 12, 2020
अशा परिस्थितीत सर्व कलाकर अधिक सतर्क झाले आहेत. तसेच ट्विट करत अमिताभ बच्चन यांचा प्रकृतीबाबत प्रार्थना करत आहे. यातच अभिनेत्री जुही चावलानेही ट्विट केले मात्र तिच्या ट्विटमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.
अमित जी, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या… तुम्ही लवकरात लवकर ठिक होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे. माझ्या आधीच्या ट्विटमध्ये कोणतीही चुक नव्हती.
मी ते तसेच म्हटले होते. जेव्हा मी आयुर्वेद म्हटले तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की निसर्गाच्या कृपेने सगळं काही लवकर ठिक होऊ दे या आशयाचे ट्विट तिने करत ट्रोलिंग करणाऱ्या युजर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.