पुणे – वारी कालावधीत भिक्षेकरूंवरही ठेवणार नजर

पुणे – पालखी सोहळ्यांमध्ये भिक्षेकरूंची संख्या वाढणार आहे. त्यांच्यावर भिक्षेकरू केंद्राच्या खास पथकांच्या माध्यमातून “नजर’ ठेवण्यात येणार आहे.

पूर्वी भिक्षेकरूंना पकडून त्यांना या सुधारगृहात नेल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येत होती. मात्र, तेथून सुटल्यानंतर ते पुन्हा भिक्षा मागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने वारीच्या कालावधीत दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी नेमण्यात आलेली खास पथके देऊ आणि आळंदी येथून पालखी सोबत चालत येणार आहेत.

त्यांचा हा पहारा सासवड आणि लोणी काळभोर पर्यंत राहाणार आहे. या भिक्षेकरूंना पकडून या सुधारगृहात आणण्यात येणार आहे, अशी माहिती भिक्षेकरू केंद्राचे समन्वयक बी. एस. काळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.