ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी लांबणीवर

पुणे – संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी दि. 26 जून रोजी आयडीटीआर भोसरी परिसरातून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे दि. 26 रोजी आळंदी रस्ता येथील चाचणी मैदान आणि भोसरी येथील आयडीटीआर येथील ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी होणार नाही. परिणामी दि. 26 रोजीची अपॉईंटमेंट मिळालेल्या उमेदवारांनी दि. 27, 28 आणि 29 जून रोजी चाचणीसाठी हजर राहायचे आहे.

तर दि. 28 जून रोजी पालखी पुण्यातून सासवडकडे प्रस्थान करणार हडपसर ते सासवड मार्गादरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या दिवशी दिवे येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर वाहनांची तपासणी होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या वाहन चालकांनी वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दि. 28 जून रोजीची पूर्व नियोजित वेळ घेतली आहे, अशा वाहन चालकांनी दि. 30 जून रोजी तपासणीसाठी दिवे येथे सादर करावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.