नोव्हेंबर – पाचव्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (लिफी) यंदा साथीचा प्रादुर्भाव पाहता ऑनलाइन योजण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने लोकांना महोत्सवातील चित्रपट पाहता येतील. त्यासाठी प्लेक्सिगो (यूएफओ मूव्हीजचे एक अंग) हे मोबाईल अँप त्यांना www.onelink.to/Plexigo या दुव्यावर जाऊन डाऊनलोड करावे लागेल. चित्रपट महोत्सवासंबंधी अधिक माहिती www.liffi.in या संकेतस्थळा भेट देऊन, फेसबूक: www.facebook.com/LIFFIIndia येथून मिळविता येईल. दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर, 4 ते 6 डिसेंबर आणि 11 ते 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून हा फिल फेस्टीव्हल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
यापूर्वी महोत्सवाचे प्रत्यक्ष रूपात आयोजन हे ट्रायोझ प्लाझा, लोणावळा येथे करण्यात आले होते. लिफी आपल्या पाचव्या वर्षातील आवृत्तीत उत्कृष्ट चित्रपट निर्माते आणि वितरक एन. एन. सिप्पी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे आणि त्यांच्या वो कौन थी, गुमनाम, देवता, सरगम, फकिरा, चोर मचाए शोर आणि अन्य काही उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शनही केले जाईल. या व्यतिरिक्त “पापा कहते है…’ सारखा चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा लाभलेला “मुक्ती भवन’ हा चित्रपटही दाखविला जाईल.
लिफी महोत्सवाचे संचालक माधव तोडी म्हणाले, आम्ही विद्यमान साथीचा फैलावामुळे यावर्षी हा उत्सव ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला आहे. रंजक चित्रपट, तज्ज्ञांबरोबर परस्पर-संवादी चर्चा आणि कार्यशाळांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्हाला निरंतर सुरू ठेवायचा आहे. म्हणून आम्ही प्रत्येकासाठी त्यांच्या घरातील आरामदायी वातावरणात कुटुंबासह आनंद घेण्यासाठी प्रत्येकाला मनोरंजनात्मक निवडीचे पर्याय देऊन एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
महोत्सवाच्या यापूर्वीच्या चार आवृत्त्या खूपच यशस्वी राहिल्या आहेत. श्याम बेनेगल, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, केतन मेहता, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, केतन मेहता, दीपा साही, रजित कपूर, मुकेश खन्ना, कंवलजीत सिंग यांच्यासारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित कलाकार आणि चित्रपट निर्माते यांनी उपस्थिती दर्शवून या महोत्सवाका प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. अनंत महादेवन, विवेक वासवानी यांच्यासह रिंकी भट्टाचार्य, मयंक शेखर, जॉय सेनगुप्ता, तुषार भाटिया, संदीप सोपारकर यासारख्यां मान्यवरांसह सिनेसृष्टीतील नामांकितांनी भेट देऊन आणि कार्यशाळांना उपस्थित लावून अनेक मीडिया स्कूल्समधील विद्यार्थी (मुंबई व पुण्यातील) चित्रपटातील रसिकांना फायदा झाला आहे.