‘येत आहे…दुर्गामती’ ; भूमीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आऊट

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या आगामी “दुर्गावती’ चित्रपटाचे नाव बदलून “दुर्गामती’ असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. हा चित्रपट “भागमती’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे

भूमी पेडणेकरने आपल्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्रीने पोस्टर शेअर करत लिहिले की, “येत आहे… दुर्गामती.’ या पोस्टरमध्ये भूमी खूपच इंटेंस लुकमध्ये आरशासमोर असल्याचे दिसते.

तर आता या चित्रपटाचा ट्रेलर आऊट  झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरसोबत अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर थ्रिलर आणि हॉररने परिपूर्ण आहे. भूमी पेडणेकप एका वेगळ्या अवतारात पहायला मिळते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

भूमीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. हा हॉरर-थ्रिलर चित्रपट पुढील महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. ओरिजनल तेलुगू चित्रपटात अनुष्का शेट्टीने मुख्य भूमिका साकारली होती. यात तिने एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, ज्यात तिच्यामध्ये एका राणीची आत्मा प्रवेश करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

दरम्यान, भूमी पेडणेकरने यापूर्वीही चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले होते, ज्यात “दुर्गावती’ असे चित्रपटाचे नाव दर्शविण्यात आले होते. या चित्रपटात भूमी पेडणेकरसह अर्शद वारसी, माही गिल, जिशू सेनगुप्ता आणि करण कपाडिया निर्णायक भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट अक्षयकुमार आणि भूषण कुमार यांनी प्रोड्यूस केला असून अशोक यांनी दिग्दर्शन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.