48व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांत ‘दिल्ली क्राइम’ सर्वोत्कृष्ट

मुंबई – “दिल्ली क्राईम’ या नेटफ्लिक्‍सवरील वेबसिरीजमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या रोलमध्ये झळकलेली अभिनेत्री ‘शेफाली शाह’ची इमानदार पोलीस अधिकारी महिलेची भूमिका खूप गाजली होती. दरम्यान, या वेबसिरीजची लोकप्रियता बघून 48व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजचा पुरस्कार ‘दिल्ली क्राईम’ला जाहीर करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे 48व्या वर्षात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स लाइव्ह पार पडला. 2012 साली दिल्लीत झालेल्या गँगरेपवर आधारीत ही सीरिज आहे. दिल्ली क्राइममधील अभिनेत्री शेफाली शाहने या सीरिजला एमी अवॉर्ड्स मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

“मी खूप खूश आहे. हे खूप अप्रतिम आहे. दिल्ली क्राइमचा हिस्सा बनल्यामुळे मला खूप अभिमानास्पद वाटत आहे. हा विजय माझ्यासाठी सोने पे सुहागा आहे. मला माहित आहे की माझ्यासाठी हा शो खूप स्पेशल आहे. एमीने आम्हाला जागतिक मंचावर आणले आहे आणि या सन्मानामुळे अभिमानास्पद वाटत आहे.” असं शेफाली म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.