Loksabha Elections 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यापैकी केवळ एक मुस्लिम उमेदवार अब्दुल सलाम यांना केरळमधील मलप्पुरममधून तिकीट देण्यात आले आहे. या यादीत केरळमधून 12 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. जाणून घ्या केरळमधील लोकसभेच्या कोणत्या जागेवरून कोणाला तिकीट मिळाले
केरळमधून भाजप ऐकून १२ जणांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये कासरगोड येथून एमएल अश्विनी तर कन्नूर येथून सी रघुनाथ, वडकरा येथून प्रफुल्ल कृष्ण, कोजिक्कोड येथून एमटी रमेश, मलप्पुरममधून डॉ. अब्दुल सलाम, पोन्नानी येथून निवेदिता सुब्रमण्यन, पलक्कड़ मधून सी कृष्णकुमार, त्रिशूर येथून मशहूर एक्टर सुरेश गोपी, अलपुझामधून शोभा सुरेंद्र, पत्तनमतिहट्टा मधून अनिल के. एंटनी, अट्टिंगल – वी. मुरलीधरन आणि तिरुवनंतपुरम मधून राजीव चंद्रशेखरला टिकट देण्यात आले आहे.
भाजपच्या 195 नावांच्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार अब्दुल सलाम चर्चेत
अब्दुल सलाम हे रिटायर्ड वाइस चांसलर आहे. डॉ. अब्दुल सलाम बीजेपी उमेदवारी असून ते केरळच्या तिरूर मतदार संघातून येतात. २०२१ मध्ये अब्दुल सलाम यांनी 135 मेमोम (केरल) निर्वाचन क्षेत्रातून निवडणूक लढवली होती. ते कालीकट यूनिवर्सिटीमध्ये वाइस चांसलर होते, ते 2011 ते 2015 मध्ये कालीकट यूनिवर्सिटीमध्ये वाइस चांसलर होते.
त्यावेळी कुलगुरू बनवताना शिक्षक आणि विद्यार्थी संघटना त्यांचे विरोधक होते. डॉ अब्दुल सलाम हे विद्यार्थी राजकारणाच्या विरोधात होते आणि त्यावर बंदी घालावी अशी इच्छा होती. मात्र, या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. My Neta.info नुसार त्यांची एकूण संपत्ती 6 कोटी 47 लाख रुपये आहे. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
हेही वाचा
Ajit Pawar on Supriya Sule। ‘अजित पवार यांना भेटणं टाळलं’ सुप्रिया सुळे म्हणाल्या…