Loksabha 2024 : भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरु केल्यानंतर आता स्थानिक पक्षांनी देखील आपली राजकीय भविष्यासाठी युती आघाड्या करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशात देखील लोकसभेसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ११ जागांसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
उत्तर प्रदेश हे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणारे राज्य असल्यामुळे याठिकाणी ज्याच्या सर्वाधिक जागा तो दिल्ली सहज कोबी करू शकतो असाच आजवरचा इतिहास आहे. अशात समाजवादी पक्षाने यूपीत लोकसभेच्या ११ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये गाझीपूर येथील उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे जो बसपामध्ये होता. | BSP MP’s name in sapa list
बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांना सपाने येथून उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाच्या या कृतीमुळे आता बसपासमोर अडचण निर्माण झाली आहे. गाझीपूर येथून कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. | BSP MP’s name in sapa list
कॉंग्रेस प्रतापगढ येथून उमेदवार रिंगणात उतरवणार होती. मात्र सपाने येथूनही एस. पी. सिंह पटेल यांना तिकीट दिल्यामुळे कॉंग्रेसचीही अडचण झाली आहे. अगोदर कॉंग्रेससोबत जागावाटप होईल व त्यानंतरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाईल असे आजच सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. सपाच्या आजच्या यादीमुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे व ती म्हणजे आता आगामी लोकसभा निवडणुकीत जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल आता समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढवणार नाही.