मंचर, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कळंब (ता. आंबेगाव) येथे शिवपूतळ्याचे पूजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन भालेराव यांनी पहाटे शिवज्योत प्रज्वलित करून ती वाजतगाजत कळंबकर युवकांनी गावात आणली. सरपंच उषा सचिन कानडे, पूजा भालेराव यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी युवा कार्यकर्ते रोहन कानडे, कुमार भोकसे, हर्षल भालेराव, प्रमोद पिंगळे, सचिन कानडे, प्रमोद भालेराव, निलेश भालेराव, गणेश कानडे, विलास भालेराव, शुभम भालेराव, रोहन भालेराव, गणपत भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत समोरील सभामंडपात शिवप्रभूंच्या पुतळ्याचे पूजन उपस्थित ग्रामस्थांनी केले. सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण आणि ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन समीक्षा देशमुख, अमृता कानडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे, ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे यांनी राजमाता जिजाऊ आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांचेही पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. आदर्श शिक्षक विकास कानडे, संतोष कानडे, राहुल भालेराव, नितीन कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.