पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका पार पाडणार आहेत. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि. 12 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे,
तर मतदान दि. 7 मे रोजी होणार आहे. पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 18 एप्रिलपासून सुरुवात होणार असून, मतदान दि.13 मे रोजी होणार आहे. या चारही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशात लोकसभा सात टप्प्यांत, तर राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात, तर पुणे, मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांत एकूण 81 लाख 27 हजार 19 इतके मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 42 लाख 44 हजार 314 इतकी, तर महिला मतदारांची संख्या 38 लाख 82 हजार 10 एवढी आहे. जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या 8 हजार 213 आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – दि. 12 एप्रिल 2024
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – दि. 19 एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 20 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – दि. 22 एप्रिल
मतदान – दि. 7 मे 2024
मतमोजणी – दि. 4 जून 2024
पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघ
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – दि. 18 एप्रिल 2024
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – दि. 25 एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 26 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – दि. 29 एप्रिल
मतदान – दि. 13 मे 2024
मतमोजणी – दि. 4 जून 2024
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
वडगावशेरी – 4,52,628
शिवाजीनगर – 2,72,798
कोथरुड – 4,01,419
खडकवासला – 5,21,209
पर्वती – 3,34,136
पुणे कॅन्टोन्मेट- 2,69,588
कसबा पेठ – 2,72,747
बारामती मतदारसंघातील मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
दौंड- 2,99,260
इंदापूर – 3,18,924
बारामती – 3,64,040
पुरंदर – 4,14,690
भोर- 3,97,845
खडकवासला – 5,21,209
शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
जुन्नर -3,08,439
आंबेगाव – 2,98,598
खेड- 3,45,035
शिरुर- 4,29,818
भोसरी- 5,35,666
हडपसर- 5,62,186
मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
मावळ – 3,67,779
चिंचवड – 5,95,408
पिंपरी- 3,64,806
पनवेल – 5,63,915
कर्जत – 3,04,523
उरण – 3.09,275