Lok Sabha Election date। लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक उद्या म्हणजेच शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबत माहिती दिली आहे. उद्या दुपारी 3 वाजता या निवडणुकी घोषणा करण्यात येणार आहे. यासाठी आयोगाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होतीलयाविषयी माहिती देण्यात येणार आहे.
उद्या दुपारनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार Lok Sabha Election date।
नवनियुक्त आयुक्तांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर पूर्ण आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक सुमारे 45 मिनिटे चालली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखासंदर्भात माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यासोबतच उद्या दुपारनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार असल्याचे सांगण्यात येतंय.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे 2024 दरम्यान होऊ शकतात आणि त्या सात ते आठ टप्प्यांत घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये या विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका
लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणूक आयोग जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही जाहीर करणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत काय निर्णय होणार? आगामी लोकसभा निवडणूकही 2019 प्रमाणे सात टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुका सात टप्प्यात झाल्या होत्या Lok Sabha Election date।
2019 च्या लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान 19 मे रोजी पार पडले. 2019 मध्ये 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान झाले होते. 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.
हेही वाचा
प्रतीक्षा संपणार ! लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज होणार जाहीर ? ; जाणून घ्या कसा असेल वेळापत्रक