Lok Sabha Election 2024 । Star Campaigner – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील महायुतीच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप चांगलीच तयारीला लागली आहे. । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले आणि विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले, अन्नामलाई यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर या लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करतील.
स्टार प्रचारक म्हणजे नेमकं काय? । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते. या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो. त्यामुळे निवडणुकीत उभं असणाऱ्या उमेदवारांना वाटते आपल्या प्रचाराला स्टार प्रचारकाने यावे.
मात्र त्यांच्या रॅली, सभांवर मोठा खर्च होतो. स्टार प्रचारकाला वेळेअभावी अनेक ठिकाणी सभेला जाण्यास विमान, हेलिकॉप्टरसह अन्य गोष्टी लागतात. त्यामुळे स्टार प्रचारकाचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही.
हा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला संधी द्यायची आणि नाही हा निर्णय त्या पक्षाचा असतो. स्टार प्रचारक यांचा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे.
कोण आहेत स्टार प्रचारक? । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
नरेंद्र मोदी
जगतप्रकाश नड्डा
राजनाथ सिंह
अमित शाह
नितीन गडकरी
योगी आदित्यनाथ
प्रमोद सावंत
भूपेंद्रभाई पटेल
विष्णूदेव साय
मोहन यादव
भजनलाल शर्मा
एकनाथ शिंदे
अजित पवार
रामदास आठवले
नारायण राणे
अनुराग ठाकूर
ज्योतिरादित्य शिंदे
स्मृती इराणी
रावसाहेब दानवे पाटील
शिवराज सिंह चौहान
देवेंद्र फडणवीस
सम्राट चौधरी
अशोक चव्हाण
विनोद तावडे
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
पीयूष गोयल
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
के. अण्णामलई
मनोज तिवारी
रवी किशन
अमर साबळे
विजयकुमार गावित
अतुल सावे
धनंजय महाडिक