#लोकसभा2019 : सहाव्या टप्प्यासाठी दुपारी 4.30 वाजेपर्यंत 50.80 टक्के मतदान

नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशभरातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. अनेक बडे चेहरे रिंगणात असल्याने सहाव्या टप्प्याबाबत मोठी उत्सुकता आहे.

सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेश (14 जागा), हरियाणा (10 जागा), झारखंड (4 जागा) बरोबरच बिहार, मध्य प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी 8 जागांसाठी मतदान होत आहे. सहाव्या टप्प्यात दुपारी 4.30 वाजेपर्यंत एकूण 50.80 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 4.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

बिहार- 44.40 %
हरियाणा – 51.97 %
मध्य प्रदेश – 52.78 %
उत्तर प्रदेश – 43.26 %
पश्चिम बंगाल- 70.53 %
झारखंड – 58.08 %
नवी दिल्ली – 45.24 %

त्याशिवाय, दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा निवडून देण्यासाठी मतदार त्यांचा हक्क बजावत आहेत. या टप्प्यात 10 कोटींहून अधिक मतदार त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी पात्र आहेत. लोकसभेच्या 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.