पुणे – देशासह संपूर्ण जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे जगातील जास्तीत जास्त देश लॉकडाउनच्या स्थितीत आहेत. या बंदच्या काळात मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर देशाला स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या सफाई सेवकांचा भारतभर सन्मान केला जात आहे. पुण्यातील भुसारी कॉलनी येथे नागरिकांनी शहरातील सफाई सेवकांवर फुलांचा वर्षाव करून, आभार मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.