कोरोनामुळे पबजी 24 तास बंद

नवी दिल्ली –   जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. पबजी हा जगातील टॉप मोबाईल व्हिडिओ गेमपैकी एक आहे. भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

घराघरांत पबजी खेळणारी मुले असून परीक्षा जवळ आल्यामुळे पबजीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र आता पबजी युजर्सना 24 तास पबजी खेळता येणार नाही. जगभरात पबजी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने स्वतः युजर्संना नोटिफिकेशन पाठवून दिली आहे.

4 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 5 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तास पबजी बंद राहणार आहे. त्यामुळे युजर्सना यावेळेत गेम खेळता येणार नाही. ‘Temporary Suspension of Service’ असं म्हणत कंपनीने युजर्सना याबाबत एक नोटिफिकेशन पाठवले आहे. कोरोनाचा संसर्ग हा वेगाने होत आहे. त्यामुळेच कोरोनामुळे पबजी 24 तास बंद असणार आहे. कोरोना व्हायरसशी लढताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या लोकांना आदरांजली वाहता यावी यासाठी पबजीने हा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.