JDU Candidate List| बिहारमधील लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडीयूने रविवारी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. JDU बिहारमध्ये 40 पैकी 16 जागांवर निवडणूक लढवत आहे. जेडीयूने त्या 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दोन महिला उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तर या यादीत एका मुस्लिम उमेदवाराला देखील संधी देण्यात आली आहे.
मुजाहिद आलम यांना संधी
जेडीयूच्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे आहेत. मुजाहिद आलम या मुस्लिम चेहऱ्यालाही पक्षाने तिकीट दिले आहे. त्यांना किशनगंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुजाहिद आलम हे 2014 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत कोचाधामनचे आमदार आहेत आणि जेडीयूचे राज्य उपाध्यक्ष आहेत. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूने किशनगंज जागेवर महमूद अश्रफ यांना तिकीट दिले होते आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. JDU Candidate List|
जेडीयूचे उपाध्यक्ष बशिष्ठ नारायण सिंह यांनी पत्रकार परिषदेत एकामागून एक 16 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांची माहिती दिली. जेडीयूच्या या यादीनुसार 2019 च्या बहुतेक विजयी खासदारांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी संधी देण्यात आली होती. तर सिवानमधील कविता सिंग, सीतामढी येथील सुनील कुमार पिंटू, गया येथील विजय मांझी आणि करकटमधून महाबली सिंग यांची तिकिटे कापण्यात आली आहेत.
जेडीयूने लोकसभेसाठी कोणाला संधी? JDU Candidate List|
जेडीयूने वाल्मिकी नगरमधून सुनील कुमार, शिवहरमधून लवली आनंद, सीतामढीमधून देवेशचंद्र ठाकूर, झांझारपूरमधून रामप्रीत मंडल, सुपौलमधून दिलेश्वर कमाईत, कटिहारमधून दुलालचंद्र गोस्वामी, पूर्णियामधून संतोष कुमार, मधेपूरमधून दिनेश चंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे.
तर गोपालगंजमधून अलोक कुमार सुमन, सिवानमधून विजयालक्ष्मी देवी, भागलपूरमधून अजय कुमार मंडल, बांका येथून गिरीधारी यादव, मुंगेरमधून राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग, नालंदामधून कौशलेंद्र कुमार आणि जहानाबादमधून चंदेश्वर प्रसाद यांना तिकीट देण्यात आले आहे.
हेही वाचा: