Liquor Prices Hike From 1 April 2024: दारूप्रेमींना मोठा धक्का बसला आहे, कारण आजपासून देशात दारू महाग झाली आहे. वास्तविक आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यासोबतच नवे उत्पादन शुल्क धोरणही लागू झाले आहे. त्यामुळे बिअर, देशी, इंग्रजी दारू या तिन्ही प्रकारच्या दरात वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांतील सरकारने दारूचे नवे दर जाहीर केले आहेत. दारू ठेकेदारांनाही सूचना पाठवण्यात आल्या आहेत. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दारूचे भाव का वाढले ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन उत्पादन शुल्क धोरण 2023-24 29 जानेवारी रोजी मंजूर करण्यात आले. मोदी मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार देशातील मद्य परवाना शुल्क 10 टक्क्यांनी वाढले आहे. अबकारी दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून देशात दारू आणि बिअर महाग झाली आहे.
नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात सुमारे 45 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये दारूचे दर वाढले होते. आता दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा दारूचे दर वाढले असून त्याची अंमलबजावणी आज 1 एप्रिलपासून करण्यात आली आहे.
दरम्यान, नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू होताच बिअर आणि दारूच्या किमती जवळपास 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. विविध राज्यांमध्ये या किमतींमध्ये तफावत आहे. मात्र किंमतीमध्ये वाढ झाली आहे.