List of powerful countries : यूएस न्यूजने जगातील सगळ्यांत शक्तीशाली देशांची यादी जाहीर केली आहे. जगात कोणता देश सगळ्यांत बलवान आहे आणि आपला देश कुठल्या स्थानावर हे जाणून घेण्याची लोकांना कायमच उत्सुकता असते. ती शमवण्यासाठी ही यादी जाहीर केली जाते.
देशाची ताकद किंवा शक्ती निर्धारित करताना केवळ लष्करी ताकद किती आहे याचा विचार केला जात नाहीत तर त्याची इतरही परिमाणे असतात. सैन्य शक्तीसोबतच जागतिक पटलावरील संबंधित देशाचा प्रभाव आणि आर्थिक संपन्नता या आधारावर त्या यादीत एखाद्या देशाचे स्थान निश्चित होत असते. आताही प्रबळ देशांची यादी तयार करताना यूएस न्यूजने पाच निकष ठरवले होते. यात त्या देशाची लीडरशीप अर्थात नेतृत्व, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, भक्कम आंतरराष्ट्रीय भागिदारी आणि लष्कर यांचा समावेश आहे. | List of powerful countries
यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्या देशाची अर्थव्यवस्था २७.९७ ट्रिलियन डॉलर एवढी अवाढव्य आहे तर लोकसंख्या ३३९.९ दशलक्ष एवढी आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने यादीत दुसरे स्थान प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. चीनची अर्थव्यवस्था १८.५६ ट्रिलियन डॉलर एवढी आहे व त्यांची लोकसंख्या १.४२ अब्ज दाखवण्यात आली आहे. | List of powerful countries
युक्रेनसोबतच्या युध्दात व्यस्त असलेला रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाची अर्थव्यवस्था १.९० ट्रिलियन डॉलर आहे व लोकसंख्या १४४ दशलक्ष असल्याचे सांगण्यात आले. जर्मनी चौथ्या तर ब्रिटन पाचव्या स्थानावर आहेत. यादीनुसार जर्मनीची अर्थव्यवस्था ४.७० ट्रिलियन तर ब्रिटनची ३.५९ ट्रिलियन आहे. तर भारत १२ व्या स्थानावर आहे.
बाराव्या क्रमांकावर असलेल्या भारताची अर्थव्यवस्था ३.३९ ट्रिलियन डॉलर दाखवण्यात आली आहे. इस्त्रायल भारताच्या एक क्रमांक पुढे अर्थात ११ व्या स्थानावर आहे. | List of powerful countries