लिओनेल मेस्सीची हॅटट्रिक; बार्सिलोनाचा मार्लोकावर विजय

माद्रिद : लिओनेल मेस्सीने ‘ला लीगा’ मध्ये ३५ व्या हॅटट्रिकसह नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच मेस्सीच्या या हॅटट्रिक च्या जोरावर बार्सिलोनाने रिअल मार्लोकाचा ५-२ ने पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

मेस्सीच्या तीन गोलाशिवाय एॅटोनी ग्रिजमैन आणि लुई सुअारेज यांनी बार्सिलोनाकडून प्रत्येकी १-१ गोल केला. सध्याच्या सत्रात मेस्सीने अद्यापपर्यत सर्वाधिक १२ गोल केले आहेत. मार्लोकाकडून दोन्ही गोल एंटे बुडमिरने केले.

या विजयासह बार्सिलोनाचा संघ १५ सामन्यातील ३४ अंकासह अव्वलस्थानी पोहचला आहे. रिअल माद्रिद संघाचेही १५ सामन्यात ३४ अंक आहेत पण गोल करण्यात असलेल्या अंतराच्या फरकामुळे त्याचा संघ दुस-या स्थानी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.