शिवसेना खासदारांची बैठक रद्द

मुंबई- शिवसेना पक्षपमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. ही बैठक आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास मातोश्रीवर होणार होती. यात संसद अधिवेशनातील व्यूहरचना, सिटीजनशीप अमेंडन्मेंट बिल आणि राज्यातील कहाणी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार होती.

दरम्यान, आज सकाळी अचानकपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक नेमकी कशामुळे रद्द करावी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना-भाजप यांचे संबंध सध्या कटुतेवर पोहोचले आहेत. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गेलेले उद्धव ठाकरे आणि मोदी हे दोघे केवळ १० मिनिटे सोबत होते. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे मुंबईला रवाना झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.