पणजी – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन यानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली. सचिनप्रमाणेच अर्जुननेही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ही कामगिरी राजस्थानविरुद्ध केली असून त्याच्यासह सुयश प्रभुदेसाईने दमदार द्विशतकी खेळी केली.
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…
त्यांच्या कामगिरीच्या जोरावर गोवा संघाने सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 8 बाद 493 अशी भक्कम मजल मारली. अर्जुनने शतकी खेळी करताना पदार्पणाचा सामना गाजवला. सचिननेही 1988 साली गुजरातविरुद्ध रणजी पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी केली होती. अर्जुन 120 धावांची खेळी करत 207 चेंडूत 16 चौकार व 2 षटकार फटकावून बाद झाला. प्रभुदेसाईने 212 धावांची खेळी केली.
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…
त्याने या खेळीत तब्बल 416 चेंडूंचा सामना करताना 29 चौकार फटकावले. अर्जुननेही मुंबईकडूनच आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता, मात्र रणजी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला संधी मिळाली नाही. अखेर त्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला व पहिल्याच लढतीत विक्रमही साकार केला.