विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. महाराजांप्रमाणेच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरुणांनी आधुनिक क्षेत्रांमध्ये पारंगत व्हावे, असे आवाहन उपस्थित तरुणांना स्वराज्यचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी केले. स्वराज्य संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. जाधव बोलत होते. संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी डेक्कन येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, धर्मविर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय , छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, गणेश सोनवणे, सोमनाथ ढोले, गौतम जाधव, प्रणय शेंडे, प्रविण भोसले, डॉ. प्रविण कदम, कुणाल शिंदे, हेमंत दाभाडे, गणेश गवळी, सौरभ दौंडकर, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, किरण आंब्रे , अजय बांडे, किशोर दाताळ, सुयश चव्हाण , आकाश देशमाने, हनुमंत कुटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.