खडकवासला – खडकवासला धरणाचा कालव्यात पोहण्यासाठी आलेल्या तरुण बुडण्याची माहिती हवेली पोलीस स्टेशन कडून मिळाली असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमक केंद्राच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू आहे. जुबेर इस्माईल शेख (वय २८) राहणार भवानी पेठ पुणे असे बुडलेल्या तरुणांची नाव आहे.
तीन मित्रांसह जुबेर शेख हा खडकवासला कॅनल मध्ये पोहोण्यास आला होता. जुबेर हा एकटाच पोहत होता. त्याची तीन मित्र पोहता येत नसल्याने संरक्षण कठाड्यावर बसून होते .पाण्याचा अंदाज न आल्याने जुबेर पाण्याच्या वर आलाच नाही मित्रांनी आरडाओरडा सुरू केल्याने स्थानिक नागरिकांना एक जण बुडाल्याची माहिती मिळाली.
स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभाग पीएम आरडी च्या अग्निशामक दलाला माहिती दिली. संबंधित ठिकाणी पाण्यात उतरू नये म्हणून फलक ही लावलेला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत या कालव्यात पोहण्यासाठी तरुण नेहमीच गर्दी करत असतात.
खडकवासला चौपाटीवर सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी नियंत्रणासाठी असतील तर खडकवासला कालव्यावर का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर संबंधित विभागाचे व पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे.
धरणाचा मागच्या बाजूला कालव्यात होण्यासाठी अनेक तरुण पुणे आणि परिसराच्या भागातून येत असतात याआधीही पोहण्यासाठी आलेले अनेक तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेले आहेत पाटबंधारे खाते व हवेली पोलीस ग्रामीण यांनी अनेक वेळा पोहणाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली आहे. पण पोहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व तरुण मुलं नियमांचं पालन न केल्याने अशा घटना घडत आहेत.