मुंबई – उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘फडतूस’ हा शब्द वापरला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडतूस नही काडतूस है हम असं म्हंटल होत. ठाकरेंनी केलेल्या या टिकेवरून आता राजकारण चांगलच तापू ;लागलं आहे. कारण खासदार संजय राऊत यांनी थेट ‘फडतूस’ शब्दाचे डिक्शनरीतील अर्थ सांगितले आहेत.
ठाण्यातील महिला कार्यकर्तीला झालेली मारहाण लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने मारहाण झालेल्या महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना, राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे म्हटले होते. ठाकरेंच्या या टीकेला आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. आम्ही फडतूस नाही तर काडतूस आहोत असं फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीसांच्या या प्रत्युत्तरानंतर संजय राऊत यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही कुठे म्हंटल झुका म्ह्णून.. हे एवढे वाकले आहेत कि वाकून वाकून मोडून पडले आहेत. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. आमच्या महिला कार्यकर्त्यावर हल्ला झाला त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. तरी सरकार कारवाई करत नाही. याच सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलंय. उद्धवजींनी अत्यंत सौम्य शब्द वापरला ‘फडतूस’ त्यावर ते म्हणतात आम्ही नागपूरचे आहोत. आम्ही महाराष्ट्राचे आहोत आणि नागपूर देखील महाराष्ट्रातच आहे. नागपूर वेगळं नाही असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला.
काय म्हणाले राऊत नेमकं
‘फडतूस’ हा शब्द मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे. डिक्शनरी पहा जरा त्यामध्ये फडतुसाचा अर्थ असा आहे.मिनींगलेस.. वर्थलेस.. युजलेस.. बिनकामाचे लोक. हे सरकारच बिनकामच आहे त्यासाठी फडतूस शब्द वापरला असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं. त्यामध्ये भिजलेलं काडतूस एवढं आतमध्ये जाण्याचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल ओ.. अशी भिजलेली काडतूस या महाराष्ट्रात खूप पाहिली आम्ही. तुमचं खरं काडतूस सीबीआय आणि ईडी आहे म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. अशी जळजळीत टीका राऊत यांनी यावेळी केली.