Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज १३ मे रोजी मतदान होत आहे. टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होत आहे. यात पुणे लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे.
अशात आज सकाळी सात वाजता पुण्यातील सर्व मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली सकाळी नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. ती पुढील प्रमाणे…
कसबा पेठ विधानसभा
6 पूर्णांक 93%
कोथरूड 7 पूर्णांक 59%
पर्वती 6 पूर्णांक 99 %
पुणे कॅन्टोन्मेंट 5 पूर्णांक 69 टक्के
शिवाजीनगर 6 पुर्णांक 46%
वडगाव शेरी 5 पूर्णांक 90%