पुणे: पुण्यातील एका तरुण जोडप्याच्या मुलाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी त्याला टायरोसिनेमिया (Tyrosinemia) नावाचा एक दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. मुलाला टायरोसिनेमिया(Tyrosinemia) आणि बहुधा यकृताचा कर्करोग असल्यामुळे त्याचे यकृत निकामी झाले.
शरीरात आढळणाऱ्या प्रथिनांमध्ये हा सहसा आवश्यक घटक असतो. मात्र या आजारात विभाजन बिघाडामुळे विषारी घटक जमा होतात. यामुळे रुग्णाला जीवन जगणे कठीण होते. या अवस्थेत मुलावर उपचार सुरु होते. परंतु दुर्दैवाने हा आजार वाढत गेला. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यानंतर, यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला.
मुलांमध्ये यकृत प्रत्यारोपण अनेकदा खूप आव्हानात्मक असते. विशेषत: यासारख्या मुलामध्ये ज्याचे वय ६ महिन्यांचे होते आणि त्याचे वजन केवळ ५.८ किलो होते. त्याच्यामध्ये खूप लहान रक्तवाहिन्या असतात. त्या नवीन यकृताशी जोडणे आवश्यक आहे. ऑपरेशन तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असते.
अशा कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाही मुलाच्या पालकांनी यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्याने यकृताचा एक छोटा भाग देण्याचे मान्य केले. तसेच ते यासाठी योग्य असल्याचे सिद्ध झाले. सर्व आवश्यक चाचणी आणि निदान प्रक्रिया पार पडली. २७ मे २०२० रोजी प्रत्यारोपण करण्यात आले. पुण्यातील बाणेरच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये १२ तासांपेक्षा जास्त वेळ ही शस्त्रक्रिया चालली.