मुंबई – मुंबईतील विलेपार्ले परिसरात असलेल्या एलआयसी कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आहे. सकाळी सात वाजता ही घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.
#WATCH Maharashtra | Fire breaks out in LIC office building at Santacruz in Mumbai. Eight fire tenders at the spot
As per fire officials, Fire confined to electric wiring, installation, computers, file records, wooden furniture, etc. in Salary Saving Scheme section on 2nd floor pic.twitter.com/nMEvykgrN1
— ANI (@ANI) May 7, 2022
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी नाही मात्र विजेच्या तारा, संगणक, फाइल रेकॉर्ड, फर्निचर जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Maharashtra | Fire breaks out in LIC office building in Santacruz area in Mumbai this morning, eight fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. No injuries or casualties reported. pic.twitter.com/ekV1B7TdxT
— ANI (@ANI) May 7, 2022