लिबीयात पुन्हा यादवी युद्धाची लक्षणे ; अमेरिकेच्या फौजांची माघार

बेंगाझी – लिबीयामधील आपल्या काही फौजा सुरक्षिततेच्या कारणास्तव माघारी घेणार असल्याचे अमेरिकेच्यावतीने रविवारी जाहीर करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून इस्लामिक स्टेट आणि अल कायदाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या काही फौजा लिबीयामध्ये होत्या. मात्र आता तेथील परिस्थिती गुंतागुंतीची आणि अंदाज वर्तवण्यापलिकडे असल्याने माघारीचा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकेच्या तळाचे प्रमुख मरीन कॉर्प जनरल थॉमस वालहॉसर यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात लिबीयामध्ये लिबीयन नॅशनल आर्मीने अचानक राजधानी त्रिपोलीवर हल्ला केला होता. फिल्ड मार्शलखलिफा हिफ्टरच्या नेतृत्वाखालील या हल्ल्यामुळे लिबीयात पुन्हा यादवी युद्धाची चिन्हे दिसायला लागली आहेत. त्या यादवी युद्धात अमेरिकेला विनाकारण पडावे लागले असते.

लिबीयामध्ये 2011 साली तत्कालीन हुकुमशहा मोहम्मर गद्दाफीची सत्ता उलथवून टाकण्यात आली. गद्दाफीला ठार केल्यापासून तेथे परस्पर विरोधी गटांची सत्ता आहे. पूर्व लिबीया आणि त्रिपोलीमध्ये वेगवेगळ्या गटांची सत्ता आहे. रविवारी त्रिपोलीपासून 24 किलोमीटर अंतरावरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिफ्टर आणि त्यांच्या सैन्याने जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्याला संयुक्‍त राष्ट्राच्या पाठिंबा असलेल्या सैन्याकडूनही हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.