नवीदिल्ली – केंद्रासह अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. दिल्लीमध्ये भाजपाची मोठी ताकद असूनही त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’पुढे हार पत्करावी लागली होती. आता दिल्ली भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. एका आमदाराने खासदार गौतम गंभीरवर नाव न घेता निशाणा साधला आहे. भाजप आमदार अनिल वाजपेयी यांनी नाव न घेता एलजी व्हीके सक्सेना यांना पत्र लिहून एनजीओंना डंपिंग ग्राउंड्सचे बेकायदेशीर वाटप केल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
खासदार गौतम गंभीर यांचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरी, संकेत स्पष्ट आहेत क्रिकेटपटू बनलेले राजकारणी, त्याच्या एनजीओच्या माध्यमातून स्वयंपाकघर चालवतात, जिथे दररोज 1 रुपयात सुमारे 3,000 लोकांना जेवण दिले जाते. यासाठी त्यांनी कम्युनिटी किचनसह एक लायब्ररीही बांधली आहे, जिथे आधी प्रिया एन्क्लेव्हमध्ये MCD डंपयार्ड होते. यावरूनच गंभीर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे.
आमदार अनिल बाजपेयी यांनी उपराज्यपालांना लिहिलेल्या पत्रात अधिकारी, स्वयंसेवी संस्था किंवा खाजगी संस्था नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनिल बाजपेयी यांनी गौतम गंभीरवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही.माध्यमांनी त्यांना थेट गौतम गंभीर यांच्याबाबत विचारले असता त्यांनी थेट नाव घेणे टाळलं.