मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवात १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे,” असेदेखील मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन सांगण्यात आले आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. #Nashik
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 8, 2022
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अपघातावर खेड व्यक्त केला आहे. त्यांनी, “नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत,” असे ट्वीटरवरुन म्हटले आहे.
सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत. #Nashik— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2022
त्याचप्रमाणे, “सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आमदार देवयानी फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.