मुंबई – ‘मला माझ्या आई बहिणीवरून बोललं गेलं तरी मी एकवेळ ऐकून घेईल पण मोदींविषयी बोललेलं मी खपवून घेणार नाही, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर आता राजकीय पक्षांकडून टीका होत असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या या विधानावरून चंद्रकांतदा बोलले ती कोणती हिंदू संस्कृती? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.
दरम्यान, नाना पटोले म्हणाले,’चंद्रकांत पाटलांना आपल्या आईना शिव्या तर चालेल. पण मोदी शहा यांना त्रास दिला नाही म्हणजे कोणती संस्कृती? जन्मदात्याबद्दल अभिमान असावा. त्यांच्या रचनेची पण चंद्रकांतदा बोलले ती कोणती हिंदू संस्कृती?, असेही पटोले म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले. पुणे भाजपाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात ते बोलत होते.