प्रत्येक कलाकार आपल्या कलेने लोकांचे मनोरंजन करत असतो. मात्र, आपण कधी-कधी विसरून जातो, की या लोकांनासुद्धा मन, भावना आणि दु:ख असते. हे कलाकार आपलं दु:ख लपवून पडद्यावर जगत असतात.
View this post on Instagram
असंच काहीसं मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेच्या बाबतीत पाहायला मिळाले. “चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया नेहमीच लोकांना हसवायचे काम करत असते. मात्र, तिला किती दु:ख आहे, हे तिने लपवून ठेवले होते.
View this post on Instagram
सध्या जयपूरमध्ये “हवा येऊ द्या’चं शूटिंग सुरू आहे. यावेळी स्वप्नीलने एका दुःखद गोष्टीचा खुलासा केला. श्रेयाने नुकतंच आपल्या 2 लाडक्या मावशींना गमावले आहे. या दोघींना करोनाची लागण झाली होती.
View this post on Instagram
याबद्दल श्रेया म्हणाली, या दोन्ही मावशींना करोनाची लागण झाली होती. अवघ्या 24 तासांमध्ये या दोघींचे निधन झाले.
View this post on Instagram
दरम्यान, या दोन्ही मावशींसोबत श्रेयाचे खूप घट्ट नाते होते. श्रेया त्यांची खूपच लाडकी होती. मात्र, त्यांच्या या अशा जाण्याने श्रेया व तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram