नगर – नगर मधील मोहरम देशभरात प्रसिद्ध आहे. यंदाही मोहरम गणेशोत्सवाच्या काळातच आली असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दोन्ही उत्सावाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सुमारे दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
या दोन्ही मिरवणुकांवर तीन ड्रोनसह 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तसेच कत्तलच्या रात्रीच्या मिरवणुकीच्या मार्गावरील 37 आणि मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरील 27 इमारती पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. विशेष करून, मोहरमच्या दोन मिरवणुकांवर शहर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी राज्यभरातून अतिरीक्त बंदोबस्त बोलावून घेण्यात आला आहे.