पुणे – १९३८ मधे स्थापन झालेल्या कुसरो वाडिया महाविद्यालयाचा १२ वा माजी विद्यार्थी मेळावा रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या प्रांगणात मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला.
यावर्षीचा ” डायमंङ आॕफ सिडब्लुआयटीयन ” हा पुरस्कार १९९२ च्या विद्युत अभियांञिकीचे चे विद्यार्थी ,इस्काॕनचे अनुयायी ,जगातील ५२ पेक्षा जास्त देशामध्ये आपल्या व्याख्यानासाठी प्रसिद्ध असणारे अध्यात्मिक गुरु श्री गौर गोपाल दास यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन अश्विनी अत्रे -कुलकर्णी यांनी केलं. यावेळी गौर गोपाल दास यांनी आपल्या मनोगतामधुन जुन्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी १९६४ च्या विद्युत अभियांत्रिकी बॕचचे विजय अत्रे यांनी ५१ हजारांची तर विद्युत विभागाच्या १९९२ च्या संपूर्ण बॕचकडुन महाविद्यालयासाठी १लाख ३० हजारांची मदत करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत संघटना असुन शिकत असलेल्या हुशार व गरजु विद्यार्थ्यांना यातुन दरवर्षी स्काॕलरशीप दिली जाते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर राव , यंत्र विभाग प्रमुख यु एन कांबळे , विद्युत विभागाच्या कांचन मानकर ,अणु विद्युत विभाचे ए एस चांडक, संगणक विभागाचे ए ए जांभळे यांच्या सह असंख्य आजी- माजी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव व प्राध्यापक अनिल शेलार यांनी स्वागत तर प्रास्तविक अध्यक्ष ज्ञानेश्वर मोळक यांनी केले. आभार प्रदर्शन मोहन अंतुरकर यांनी मानले.