अलीगढ़ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडणार असल्याचे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश भाजपचे स्थानिक नेते रघुराज सिंह यांनी केले आहे.
नागरी दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ झालेल्या मोर्चाला ते संबोधित करीत होते.ते म्हणाले, हे एक टक्के लोक आमचे पैसे देशाच्या टॅक्सचे पैसे खाऊन देशासोबत गद्दारी करीत आहेत आणि मोदी, योगी मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत.
आम्ही घोषणा देणाऱ्यांना जीवनात गाडू असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना दिला. मोदी-योगी देश आणि राज्य चालवतील जसे चालले आहेत तसे चालतील” असेही ते म्हणाले .
नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या प्रसारासाठी नुमाईश मैदानावर सभा घेण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते. भाजपने या वक्तव्याशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितले कि, रघुराज सिंह मंत्री किंवा आमदार नाहीत.