पुणे – मटण बनविण्यास उशीर लागेल असे सांगितल्याने पतीने पत्नीचे ठोसा मारुन दोन दात पाडले. याप्रकरणी पतीविरुध्द चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकरन नागराजन नाडार (45,रा.औंधगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार घटनेच्या दिवशी प्रभाकरन हे दारु पिऊन आले होते. त्यांनी सोबत मटण आणले होते. हे मटण पत्नीला बनविण्यास सांगितले.
पत्नीने त्यांना दिड तासानंतर मटण बनवून देते असे सांगितले. यावर चिडलेल्या प्रभाकरन यांनी शिवीगाळ करत हाताने ठोसा मारुन पत्नीचे दोन दात पाडले. याप्रकरणाचा तपास पोलिस हवालदार काटम करत आहेत.