मुंबई – अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जोसेफ रॉबिनेट बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
त्यानंतर जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
बायडन यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाष्य केलं आहे. आव्हाड यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो व बायडन यांचा फ्लोरिडातील फोटो शेअर केला आहे.
Pawar Saheb Factor Works in US Too 😀 Hard work commitment integrity leads to victory
Hopes come alive #BidenHarris2020 pic.twitter.com/dl07FAeOVm— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 7, 2020
त्याचबरोबर या फोटोवर एक कॅप्शन सुद्धा दिल आहे. “पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरला आहे. अखंडपणे केलेले कठीण परिश्रम व वचनबद्धताच विजयी ठरते. आशा जिवंत आहेत. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जोसेफ रॉबिनेट बायडन यांनी बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2009 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य असणाऱ्या बायडन यांनी 1973 ते 2009 या काळात डेलवर प्रांताचे प्रतिनिधीत्व 1973 ते 2009 या काळात केले होते.