नवी दिल्ली – दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येची सर्वत्र चर्चा झाली होती. सिद्धू मूसेवालाच्या गाण्याने अनेकांना वेड लावले होते. तरुण वर्गात त्याची प्रचंड क्रेझ होती. आजही त्याच्या गाण्याची लोकप्रियता अधिक आहे.
त्याच्या मृत्यनंतर त्याचे वडील बलकौर सिंग यांनी पुढील काही वर्ष मुलाची गाणी रिलीज करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सिद्धू मुसेवालाच मृत्यूनंतर ‘मेरा नाम’ हे तिसरे गाणे आज रिलीज झाले आहे. याआधी त्याची ‘SYL’ आणि ‘वार’ ही दोन गाणी रिलीज झाली आहेत.
विशेष म्हणजे ह्या गाण्याला काही मिनिटांतच 2.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचा आवाज सिद्धू मुसेवालाचा आहे, तर त्याचे संगीत स्टील बांगलाझने दिले आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवालाच्या सर्वच गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आताही रिलीज झालेल्या ‘मेरे ना’ हे गाणे देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.