पुण्यातील एका हॉलमध्ये स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. ह्या वेळी समारंभाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचन संस्कृती वाढवली पाहिजे ह्यावर भर दिला. ‘आजच्या घडीला व्यावसायिक, अतिरेकी वगैरे लोक ललित साहित्य वाचत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे ते समाजापासून दूर जातात. त्यांचे समाजाशी असलेले नाते तुटत जाते. त्यामुळे माणुसकीचे भान विसरून जातात.’असं मत देशमुख यांनी यावेळी मांडलं.
दिनकर शिलेदार म्हणाले छंदश्री दिवाळी अंक स्पर्धा आंतरराष्ट्रीय असून माणिकचंद उद्योग समूहाचा सहभाग असल्याने स्पर्धेला चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे. इनफ्लक्स ग्रुपचे सहकार्य मोलाचे ठरत आहे. प्रकाश धारीवाल आणि शिवाजीराव चमकीरे यांच्या पाठबळामुळेच असे कार्यक्रम सादर होतात.
याप्रसंगी शिवाजीराव चमकीरे यांनी आणि पुण्यभूषण दिवाळी अंकाचे डॉ. सतीश देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतोष धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. राहुल शिलेदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. १० मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. २०२० व २०२१ च्या पुरस्कारांचे वितरण ह्या समारंभात करण्यात आले.