आळंदी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अलंकापुरीतील वैभव असलेल्या पुरातन संत लीलाभूमी सिद्धबेटात अजानवृक्षाची पुजा करून वृक्षारोपन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात आळंदी नगरपरिषद, आरंभ फाउंडेशन, आळंदी जनहित फाउंडेशन यांसह विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि उपस्थितांच्या हस्ते अजानवृक्षाची हरिनाम गजरात पुजा करण्यात आली.
या प्रसंगी आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील, पदाधिकारी विनायक पाटील, आदित्य पाटील, श्रावणी पाटील, अंजना गायकवाड, तानाजी भोसले, अजिंक्य जकिनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, एल्गार सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कवळासे, पोलीस मित्र वेल्फेअर कारण कोल्हे, शांताराम बोबडे, एल अँड एल प्रोडक्ट्स कंपनीचे मोरेश्वर पाटील, प्रफुल चासकर, वैभव जाधव, निखिल घोडेकर, किशोर तळेले, राजेश मोहंती, संकेत, निलेश कदम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच पुणेचे सुरेश देसाई, उल्हास दादा पठाडे, निलेश काळे, चंदू पराते, चंदू दाऊतपुरे, अलका देसाई, शिल्पा दाऊतपुरे, पल्लवी पठाडे, अनिरुद्ध देसाई, वेदिका देसाई, बाजीराव नागरगोजे, दिनकर तांबे, प्रल्हाद भालेकर, भावीक, नागरिक स्वयंसेवक आदी उपस्थित होते.