लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, त्यांची प्रकृती पूर्ण ठणठणीत होण्यास आणखी काही अवधी लागेल, अशी माहिती गुरूवारी सुत्रांनी दिली.

90 वर्षीय लतादीदींना सोमवारी पहाटे श्‍वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने येथील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत संसर्ग झाला असल्याने त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले.

आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, त्या पूर्ण बऱ्या होण्यास काही अवधी लागेल, अशी माहिती रूग्णालयाच्या सुत्रांनी दिली. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्‍वगायिका असणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.