“इफ्फी’मध्ये दाखवणार भालजी पेंढारकरयांचा ‘तांबडी माती’

पणजी : गोव्यामधे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट सुवर्ण महोत्सवात, भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटासह हृषिकेश मुखर्जींच्या ‘सत्यकाम’ तसेच ‘आराधना’ हा शक्ति सामंतांचा चित्रपट दाखवला जाणार आहे.

1960 च्या भारतीय चित्रपटांच्या सुवर्ण काळातले हे चित्रपट असून याशिवाय “इरु कोडूगल’, “वरकात्तम’, “श्री’ इत्यादी विविध भारतीय भाषेतले सुवर्णकालीन चित्रपटही प्रदर्शित होतील. येत्या 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव पणजीत होत आहे. यामधे 76 देशातले 200 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

या सुवर्ण महोत्सवाच्या “गौरव गीताची’ ध्वनिचित्रफित, तसेच रेडीओ जिंगल, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, यांनी आज प्रकाशित केली. या गौरव गीतामधे सर्वोत्कृष्ट 50 चित्रपटांची झलक नवरसांच्या माध्यमातून दाखवली आहे.या गीतात मनोरंजनाचा मूळ स्रोत ठळकपणे कसा मांडण्यात आला आहे हे सविचांनी पत्रकार परिषदेत विषद केले. 2200 वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या नाट्यशास्त्रात मनोरंजनाचे महत्व दडलेले आहे ते दर्शवणे हा यामागचा उद्देश असल्याचे खरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.