मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाचा लवकरच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
दरम्यान, ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा वठवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीने ‘ठाकरे २’ चे काम सुरू झाल्याचा खुलासा केला आहे. सध्या ‘ठाकरे २’ च्या स्क्रिप्टवर काम सुरू झालं आहे, स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाल्यावर आम्ही चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत.
तसेच, पहिल्या भागात ठाकरेंची भूमिका मी साकारली असल्याने दुसऱ्या भागातही मीच त्या भूमिकेत दिसणार आहे. असं नवाजुद्दीन म्हंटल आहे. त्यामुळे लवकरच ‘ठाकरे २’ चित्रपट सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.