लॅन्डर, रोव्हर वाचवण्यासाठी “इस्रो’ची धावपळ सुरू

बेंगळूरु – “चांद्रयान-2’चा भाग असलेल्या लॅन्डर आणि रोव्हरला वाचवण्यासाठी “इस्रो’च्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना केवळ 2.1 किलोमीटर अंतर शिल्लक राहिले असताना लॅन्डर आणि त्याच्यामध्ये असलेल्या रोव्हरचाही पृथ्वीवरील संपर्क तुटला होता. “विक्रम’लॅन्डरचे सुखरूप लॅन्डिंग झाले नाही, तर तो पृष्ठभागावर आदळला असल्याचे “इस्रो’ने रविवारी म्हटले होते.

लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावरच असल्याचे चंद्राभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या फोटोमधून स्पष्ट झाले आहे. लॅन्डरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सर्व शक्‍य ते प्रयत्न केले जात आहेत, असे “इस्रो’च्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. “विक्रम’ लॅन्डर एकसंध आहे. त्याचे नुकसान झालेले नसल्याचे ऑर्बिटरच्या फोटोंमधून दिसते आहे.

मात्र लॅन्डर नेहमीप्रमाणे चारही पायांवर उभा नाही. तो थोडा कललेला आहे, असे या मोहिमेशी संबंधित “इस्रो’च्या अधिकाऱ्याने सांगितले. लॅन्डर उलटा झालेला नाही. तर एका बाजूवर पडला आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. लॅन्डरच्या स्थितीबाबत “इस्रो’कडून अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

“विक्रम’ लॅन्डर आणि “प्रज्ञान’ रोव्हरचे आयुष्य चंद्रावरील 1 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवसांइतके आहे. त्यामुळे तेवढ्याच कालावधीमध्ये लॅन्डर व्यवस्थित कार्यरत करून रोव्हरकडून पृष्ठभागाचे परीक्षण व्हायला हवे. नियोजित ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर लॅन्डर पडला. त्यामुळे लॅन्डरच्या ऍन्टेनांची दिशा बदलून संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)