वाहतूक दंडाला गुजरातेत ‘कात्री’

अहमदाबाद – गुजरात सरकारने नुकत्याच लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. यावेळी एक सप्टेंबर पासून लागू केलेल्या कायद्या नुसार लागू केलेला दंड कमी करताना नविन कायद्याची सवय आणि त्याच्यातील दंडाच्या रकमेचा परिचय होण्यास लोकांना आणखीन वेळ आवश्‍यक असल्याचे सांगत गुजरात सरकारकडून दंडाची रक्‍कम कमी केली गेली आहे.

या संदर्भात बोलताना गुजरातमधील मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले की, नवीन कायदा आणि त्यातील आकरला जाणारा दंड या विषयी चर्चा करण्यासाठी त्यांनी नुकतीच एक बैठक आयोजीत केली होती. त्यामध्ये या विषयी सविस्तर चर्चा करून ही दंडाची रक्‍कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विना हेल्मेट गाडी चालवणे अथवा सिट बेल्ट विना गाडी चालवण्यासाठी नविन कायद्या नुसार दहा हजार रुपये दंड आकारला जाणार असला तरी गुजरात सरकार या साठी500 रुपयांचा दंड आकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर, विना परवाना गाडी चालवल्या प्रकरणी 5 हजार दंडावरून कमी करत दुचाकी साठी 2 हजार तर चारचाकीसाठी 3 हजार दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×