Kolhapur Loksabha Election| कोल्हापुरातील यंदाची लोकसभा निवडणुक फारच रंजक असणार आहेत. महाविकास आघाडीने शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहू छत्रपती यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. त्यात २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे.
यात जंगम मालमत्ता १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची तर, स्थावर मालमत्ता १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर २३.७१ कोटींची स्थावर व १७.३५ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शाहू महाराजांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत १२२ कोटी रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे. Kolhapur Loksabha Election|
विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या वाहनांची किंमत सहा कोटी आहे. त्यांच्याकडे १२२ कोटी ८८ लाख किमतीची शेतजमीन आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे. तर शाहूंच्या नावे असलेल्या १५.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या न्यू पॅलेस राजवाड्याचं बाजार मूल्य १८.११ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे एक कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत.
संजय मंडलिक यांची एकुण संपत्ती Kolhapur Loksabha Election|
कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत २०१९च्या तुलनेत तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढ झाली. मंडलिक यांची जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपये आणि १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तक आले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
हेही वाचा:
दोन दिवसांपूर्वी फडणवीसांना भेटून गेलेले नेते उत्तम जानकर आज शरद पवारांच्या भेटीला