Lok Sabha Election 2024 । माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. कारण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले उत्तम जानकर यांना थेट आमदारकीची ऑफर देण्यात आली. तर आज उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उत्तम जानकर हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. “तालुक्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तशीच चर्चा पवारसाहेबांसमोर होणार आहे. या बैठकीत निर्णय होईल, त्यासाठी मी आणि मोहिते पाटील पवार साहेबांची भेट घेणार आहोत” असं उत्तम जानकर म्हणाले.शरद पवारांकडून काय अपेक्षा आहेत?
शरद पवारांकडून काय अपेक्षा आहेत? त्यावर उत्तम जानकर म्हणाले की, “आमच्यावर दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मोहिते पाटील आणि आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक आहोत. अशा परिस्थितीत एकत्र कसं यायचं, याचं मार्गदर्शन पवारसाहेबच करु शकतात”मात्र तरीही जानकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपच्या अडचणी तशाच असल्याचे दिसतंय. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या पाठिंबा मिळवत माढा लोकसभा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र आज पुण्यात शरद पवार यांच्या भेटीमुळे भाजपचे टेन्शन वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि माळशिरस तालुक्यातील तुल्यबळ नेता अशी ओळख म्हणून उत्तम जानकर याना ओळखलं जातं. जानकरांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दोनवेळा बैठक घेतली होती. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जानकर यांच्यासाठी खास विमान पाठवून त्यांना नागपूर येथे बोलावण्यात आलं.

हे वाचाल का ? माढ्यात राजकीय घडामोडींना वेग ! उत्तम जानकरांना भाजपकडून आमदारकीची ऑफर ; 19 एप्रिलला मोठा निर्णय घेणार