पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बुधवारी सांगितले की ते अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
मात्र, त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे कोणतेही विशेष कारण नमूद केलेले नाही.अयोध्येतील आयोजन समितीने सर्व प्रमुख राजकीयपक्षांना हे निमंत्रण पाठवले आहे.
परंतु विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी ते नाकारले आहे. या कार्यक्रमावर भाजपने कब्जा केला आहे, हा धार्मिक विधी नसून पुर्ण राजकीय कार्यक्रम बनला असल्याची टीका अनेक राजकीय पक्षांनी केली आहे.
कॉंग्रेस पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशा अनेकांनी ही निमंत्रणे नाकारली आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवालांना हे निमंत्रण दिले जाणे अपेक्षित होते परंतु काल पर्यंत तरी त्यांना हे निमंत्रण मिळालेले नाही.