Lakhbir Singh : खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) या प्रतिबंधित संघटनांचा स्वयंघोषित प्रमुख लखबीर सिंग रोडे, जो भारतातून पळून जाऊन पाकिस्तानात राहत होता, त्याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 72 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.
खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचा पुतण्या, लखबीर सिंग याला UA (PA) अंतर्गत ‘वैयक्तिक दहशतवादी’ म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते आणि तो पाकिस्तानात पळून गेला होता. लखबीर सिंग यांचे भाऊ आणि अकाल तख्तचे माजी जथेदार जसबीर सिंग रोडे यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
जसबीर सिंग यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला,“माझा भाऊ लखबीर सिंग रोडे यांच्या मुलाने मला कळवले की त्याचा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो मधुमेहाचा रुग्ण होता. त्यांची दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी कॅनडामध्ये राहतात.”
मूळचा मोगा येथील रोडे गावचा रहिवासी असलेला लखबीर सिंग सुरुवातीला दुबईला पळून गेला होता. नंतर तो पाकिस्तानात गेला, पण त्याच्या कुटुंबाला कॅनडामध्ये ठेवले. 2002 मध्ये भारताने पाकिस्तानला 20 दहशतवाद्यांची यादी सादर केली होती आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.