Entertainment : मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेतील तिच्या साधेपणाने सर्वांची मन जिंकली. या मालिकेने तिला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी रेश्माची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. नुकताच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यातील तिच्या साऊथ इंडियन लुकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
काही दिवसांपूर्वी रेश्माने साऊथ इंडियन लूकमध्ये काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोझा सिनेमातील गाणं प्ले केले आहे. या व्हिडीओमध्येही ती खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रेश्मा नदीच्या किनारी बसलेली दिसते. यावेळी सुंदर पांढऱ्या रंगाची साडी आणि केसात गजरा लावल्याचे दिसते. या साऊथ इंडियन लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. तिचे हे फोटो कलाकरांसह चाहत्यांच्याही पसंतीस पडले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, रेश्माने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, रंग माझा वेगळा या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर रेश्माचा मोठा चाहता वर्ग आहे. या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. रंग माझा वेगळा या मालिकेनंतर आता रेश्मा कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार याची चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे.